शुक्रवारी रात्री कळमन्यातील विजयनगर वस्तीतील एका गोदामात लपलेल्या काही लोकांना पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी पकडून त्यांना आमदार निवासातील क्वॉरंटाइन सेंटरमध्ये पोहोचवले. ...
विदर्भात नागपूर हे कोरोनाचे केंद्रबिंदू बनले आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) गुरुवारी मध्यरात्री तपासलेल्या नमुन्यात एक, शुक्रवारी तपासलेल्या नमुन्यात चार तर पहिल्यांदाच निरीच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नमुन्यात एक पॉझिटिव्ह आल्या ...
अमेरिका प्रवासाची पार्श्वभूमी असलेला बजाजनगर येथील पहिला रुग्ण ११ मार्च रोजी पॉझिटिव्ह आला. तब्बल ४४ दिवसानंतर १०० व्या रुग्णाची आज शुक्रवारी नोंद झाली. विशेष म्हणजे, मुंबईत शंभरी गाठायला २१, नाशिकमध्ये २२ तर पुण्यात २४ दिवस लागले. ...
कोरोनाबाधित रुग्णात सातत्याने वाढ होत असल्याने हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरा परिसरात बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ३० घरातील १५० लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. ...
पिपळा रोडजवळील विठ्ठलनगर येथील आर.एस. लॉनजवळ दोन सांडांची झुंज सुरू होती. या झुंजीत दोन्ही सांड बाजूच्या खुल्या विहिरीत पडले. विहीर कमी व्यासाची व खोल असल्याने एका सांडाचा मृत्यू झाला. ...
उन्हाळा आला की मोहाफुलांच्या संकलनाची लगबग सुरू होते. अनेक आदिवासींसाठी हे उपजीविकेचे साधन आहे. मात्र या काळात जंगलांना आगीही लागतात. हे टाळण्यासाठी आणि जैव विविधतेच्या रक्षणासाठी मोहाफुले वेचण्यासाठी आणि संकलनासाठी ग्रीन नेटचा वापर केला जात आहे. ...