शहर पोलिसांनी आॅपरेशन ‘क्रॅक डाऊन’ अंतर्गत सहा दिवसात ४२५२ गुन्हेगारांची चौकशी, तपासणी अर्थात ‘स्कॅन’ केले आहे. पोलिसांनी ३२८ गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधक कारवाई केली आहे. शहर पोलिसांच्या या मोहिमेमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. ...
पोलीस उपायुक्त (झोन-४) नीलेश भरणे यांनी गुन्हेगारी घटनांवर लक्ष ठेवण्यासह विविध उद्देश डोळ्यापुढे ठेवून उद्यान रक्षक उपक्रम सुरू केला आहे. त्याअंतर्गत मंगळवारी सक्करदरा उद्यान येथे पहिली उद्यान रक्षक समिती स्थापन करण्यात आली. ...
मिलिटरी इंटेलिजन्सच्या ‘चर्चित आॅपरेशन’ची माहिती गणेशपेठ पोलिसांना कळवून नागपूरसह देशभरातील सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडवून देणा-या व्यक्तीकडे नागपूर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. या पार्श्वभूमीवर, कांगडा (हिमाचल प्रदेश) आणि भद्रावती (जि. चंद्रप ...
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला फटाके लावत रात्री १० वाजतानंतरही फटाके उडवणाऱ्या तसेच प्रतिबंधित फटाके विकणाऱ्या एकूण ६३ जणांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली. सीताबर्डी पोलिसांनी रेल्वेस्थानक मार्गावर लागलेल्या एका फटाके विक्रेत्याकडून ३२ हजारांचे प्रतिब ...
पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणाऱ्या शहरातील एका वादग्रस्त पोलीस कर्मचाऱ्यासह पाच पोलिसांचे निलंबन मागे घेण्यात आले. त्यांना परत पोलीस दलात रुजू करून घेण्यात आल्याचा आदेश सोमवारी जारी करण्यात आला. विशेष म्हणजे, पाचपैकी वादगस्त पोलीस कर्मचाऱ्यासह दोघांना ...
गिट्टीखदानमधील पेन्शननगरात एका दूध डेअरीच्या वर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शुक्रवारी रात्री पोलिसांनी छापा मारला. या छाप्यात पोलिसांना जुगार खेळणारे आठ जण सापडले. त्यांच्याकडून रोख १८ हजार, ८ मोबाईल आणि दोन मोटरसायकल जप्त केल्या. ...
गुन्हे शाखेच्या एसएसबीने जरीपटका येथील एका अपार्टमेेंटमध्ये सुरु असलेला देहव्यापाराचा आंतरराज्यीय अड्डा उघडकीस आणला. पोलिसांनी या अड्ड्याच्या सूत्रधाराकडून मुंबई आणि कोलकात्याच्या तरुणींना मुक्त केले. ...