महापालिका २०२०-२१ या वित्त वर्षात मालमत्ता करात कोणत्याही प्रकारची करवाढ करणार नाही. सन २०१९-२० या वर्षातील प्रचलित दरानुसार कर आकारणी केली जाणार आहे. ...
महापालिकेचा आस्थापना खर्च ५० टक्केहून अधिक असल्याने नवीन पदभरती नाही. आस्थापना खर्च ३५ टक्केपर्यंत खाली आला तरच नवीन भरती करता येईल, अशी माहिती महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त महेश धामेचा यांनी दिली. ...
मेट्रो रेल्वेच्या प्रस्तावित टर्नलमुळे फुटाळा तलावासमोरील रस्ता बंद क रून भरतवनमधून ५०० मीटरचा नवीन रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तयार केला जाणार होता. अखेर भरतवनचा हा प्रस्तावित रस्ता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने एकाच दिवशी सुमारे दोन हजारांवर प्लास्टिक पतंग आणि २५ चक्री नॉयलॉन मांजा जप्त केला. सुमारे ७७ दुकानांची तपासणी करून १३ हजारांचा दंड वसूल केला. ...
१४ जानेवारी पर्यंत १७१.१४ कोटींची टॅक्स वसुली झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत वसुली ४३.१३ कोटींनी वाढली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत १२८ कोटींची वसुली झाली होती. ३१ मार्चपर्यंत वसुली ३०० कोटींच्या पुढे जाण्याची आशा आहे. ...
एका एजन्सीकडे दिवसाला २०० कुत्र्यांची नसबंदी करण्याची जबाबदारी दिली आहे. आणखी एका एजन्सीची नियुक्ती करून दिवसाला ४०० तर दहा महिन्यात ७२ हजार कुत्र्यांची नसबंदी के ली जाईल, अशी माहिती मंगळवारी महापौर संदीप जोशी यांनी दिली. ...
‘आई-बाबा सांगत्ये मी तुम्हाला, लागा तुम्ही नागपूर स्वच्छतेच्या कामाला’ अशा एकापेक्षा एक घोषवाक्याची निर्मिती नागपूर शहरातील विद्यार्थ्यांनी करून आपल्यातील कल्पकतेचा आणि जागरूकतेचा परिचय दिला. ...
महापालिका प्रशासनाने शहरातील सहा विधानसभा क्षेत्रात सहा इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव २० जानेवारीच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. ...