लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून शहरातील ... ...
हैदराबादच्या एका कंपनीला १५ नोव्हेंबरपर्यंत या बसेस द्याव्यात, अशी अट सप्टेंबरमध्ये महापालिकेने घातली होती. मात्र, कंपनीने एकदम ४० बसेस देणे शक्य नसल्याचे सांगितल्याने आता टप्याटप्याने या बसेस मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
मागील चार वर्षांचा विचार करता महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात महापालिकेला १५० कोटींचे अनुदान कमी मिळाले आहे. याचा शहरातील विकासकामांवर परिणाम झाला आहे. ...
नागपूर मनपातर्फे शहरात ३० नोव्हेंबरपर्यंत 'हर घर दस्तक' अभियानांतर्गत लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत आरोग्य विभागाची चमू घरोघरी जाऊन पात्र नागरिकांचे लसीकरण करणार आहे. ...
रामटेके यांच्या शेजाऱ्याने गटार लाइनवर अतिक्रमण केले त्यामुळे गटार लाइन फुटली. घाण पाणी रामटेके यांच्या घरात स्वयंपाक खोलीपर्यंत येत आहे. याबाबत धंतोली झोनच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली मात्र, अधिकारी याची दखल घेत नाही. ...
महापालिकेने ३० नोव्हेंबरनंतर शहरातील सर्वच लसीकरण केंद्रांवर लसीचा पहिला डोस न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १ डिसेंबरपासून नागरिकांना लसीच्या पहिल्या डोससाठी पैसे मोजावे लागणार आहेत. ...
महापौरपद स्वीकारताना दयाशंकर तिवारी यांनी ७५ प्राथमिक रुग्णालयांसह अनेक योजनांची घोषणा केली होती. मात्र, मनपाची आर्थिक स्थिती आणि निवडणुकीला उरलेला तीन महिन्यांचा कालावधी बघता या घोषणा पूर्ण होणार का असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे. ...
घरकुल बांधण्याच्या योजनेसाठी राज्य सरकारच्या हिश्श्यातून पहिल्या टप्प्यातील मंजूर ११३ लाभार्थींसाठी ४० टक्के निधी दोन वर्षांपूर्वी प्राप्त झाला. त्यानंतर केंद्र व राज्याचा निधी न मिळाल्याने मनपाच्या योजनेतून एकही घरकुल साकारलेले नाही. ...