नागपुरात आता ‘हर घर दस्तक’ अभियान...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2021 01:23 PM2021-11-12T13:23:35+5:302021-11-12T13:26:05+5:30

नागपूर मनपातर्फे शहरात ३० नोव्हेंबरपर्यंत 'हर घर दस्तक' अभियानांतर्गत लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत आरोग्य विभागाची चमू घरोघरी जाऊन पात्र नागरिकांचे लसीकरण करणार आहे.

Har Ghar Dastak campaign for corona vaccination by nagpur municipal corporation | नागपुरात आता ‘हर घर दस्तक’ अभियान...

नागपुरात आता ‘हर घर दस्तक’ अभियान...

Next
ठळक मुद्देमनपाची लसीकरण मोहीमआरोग्य चमू घरी येईल अन् लस देऊन जाईल

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : केंद्र व राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव टाळता यावा, यासाठी मनपातर्फे शहरात ३० नोव्हेंबरपर्यंत 'हर घर दस्तक' अभियानांतर्गत लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत आरोग्य विभागाची चमू घरोघरी जाऊन पात्र नागरिकांचे लसीकरण करणार आहे.

या अभियानांतर्गत पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस दिला जाईल. यासाठी आरोग्य विभाग, महसूल विभाग, पोलीस विभागासह इतर विभाग, स्वयंसेवी, सामाजिक संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. लसीकरणासाठी आरोग्य विभागाची चमू शहरातील प्रत्येक नागरिकाच्या घरी जाऊन लसीकरण करणार आहे. या मोहिमेचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. मोहिमेत शहरातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले आहे.

या अभियानांतर्गत आरोग्य विभागाचे कर्मचारी प्रामुख्याने आशा वर्कर प्रत्येक नागरिकाच्या घरी भेटी देतील. याद्वारे कुटुंबातील लसीकरण व्हायचे आहे काय, याची माहिती घेणार आहे. याशिवाय लसीकरणाचा टक्का कमी असलेल्या भागात शिबिरांचे आयोजन करणार आहे. झोपडपट्टी व अस्वच्छ भागात घरोघरी भेट देऊन कोरोना संशयित वा अन्य आजारी व्यक्तींची स्थिती जाणून घेणार असल्याचे राम जोशी यांनी सांगितले.

मोहिमेला गती देण्यासाठी आशा वर्कर, स्वयंसेवी, सामाजिक संस्थांनी नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगून पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस तर एकही डोस न घेतलेल्या नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे. हर घर दस्तक अभियानात शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन लसीकरणासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही केले आहे.

- नागपुरात आतापर्यत २६,६९,९४२ नागरिकांचे लसीकरण

- १७,०१,६३४ नागरिकांनी घेतला पहिला डोस

- ९,६८,३०८ नागरिकांनी घेतले दोन्ही डोस

Web Title: Har Ghar Dastak campaign for corona vaccination by nagpur municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.