पाकिस्तानला कोरोना लस न पाठवल्याबाबत विचारणा केली असता, पाकिस्तानने कोरोना लसीची मागणी केली नाही, म्हणून आम्ही पाठवली नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. ...
भारतात अस्थिरतेसाठी अतिरेक्यांना चीनकडून दिली जातात शस्त्रे, पूर्व लडाख सीमेवर चीनने कुरापती करण्यास सुरुवात केली तेव्हाच ईशान्येकडील राज्यातही बंडखोर संघटना पुन्हा डोके वर काढून अशांतता वाढविण्याचा प्रयत्न करतील, याची कुणकुण लागली होती ...
एका छाप्यात बंदी असलेल्या टांग नॅशनल लिबरेशन आर्मीकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. यात सरफेस टू एअर मिसाइल्सदेखील होते. सांगण्यात येते की या शस्त्रांची किंमत 70,000 ते 90,000 अमेरिकन डॉलर एवढी होती. हे शस्त्र मेड इन चायना होते. ...
श्रीलंकेत राजपक्षे व प्रेमदासा ही दोन घराणी अलीकडे आलटून-पालटून सत्तेत असतात. राजपक्षे हे चीन व पाकिस्तानचे, तर प्रेमदासा हे भारताचे समर्थक. आता तेथे राजपक्षे घराणे सत्तेत आले आहे. त्यामुळे आपण सध्या तरी श्रीलंकेला भरवशाचा शेजारी म्हणू शकत नाही. ...