Myanmar: म्यानमारमध्ये रक्तरंजित रविवार; चिनी कंपनीला जाळल्याने आंदोलकांवर लष्कराचा गोळीबार, 51 ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 11:14 AM2021-03-15T11:14:49+5:302021-03-15T11:16:12+5:30

Myanmar riots: म्यानमारमध्ये फेब्रुवारीमध्ये सत्ता उलथवण्यात आली होती. म्यानमारच्या लष्कराने देशावर ताबा घेतला होता तसेच लोकांनी निवडून दिलेल्या सरकारला बेदखल केले होते. आंग सान सू यांच्यासह मोठ्या नेत्यांना तुरुंगात डांबले आहे. यानंतर लोकांमध्ये सैन्याविरोधात उद्रेक पहायला मिळाला.

Security forces killed 51 protesters in Myanmar after set fire of Chinese factory | Myanmar: म्यानमारमध्ये रक्तरंजित रविवार; चिनी कंपनीला जाळल्याने आंदोलकांवर लष्कराचा गोळीबार, 51 ठार

Myanmar: म्यानमारमध्ये रक्तरंजित रविवार; चिनी कंपनीला जाळल्याने आंदोलकांवर लष्कराचा गोळीबार, 51 ठार

Next

म्यानमारमध्ये लष्कराने सत्ता (Myanmar Army) हस्तगत केल्यानंतर परिस्थिती चिघळली आहे. रविवारी यंगून भागात आंदोलकांनी एका चीनच्या फॅक्टरीला आग (china Factory) लावली. यानंतर म्यानमारच्या लष्कराने आंदोलकांवर बेछुट गोळीबार केला. यामध्ये 51 आंदोलकांचा जागीच मृत्यू झाला आहे. गेल्या सहा आठवड्यांपासून आंदोलन सुरु आहे. (Security forces killed at least 22 anti-coup protesters in the poor, industrial Hlaingthaya suburb of Myanmar's main city on Sunday after Chinese-financed factories were set ablaze there, an advocacy group said.)


यंगूनच्या गोळीबारात 51 जणांचा मृत्यू झाला असून वेगवेगळ्या शहरांमध्ये रविवारी 12 लोक ठार झाले आहेत. एका संघटनेनुसार म्यानमारमध्ये आतापर्यंत 125 हून अधिक आंदोलक मारले गेले आहेत. या गोळीबारातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता काही जाणकारांनी वर्तविली आहे. काही ठिकाणे अशी आहेत, जिथे मृतदेह पडून आहेत. तिकडे लक्षही दिले गेले नाहीय. 


म्यानमारमध्ये सुरु असलेल्या या रक्तरंजित खेळामुळे जगाला चिंतेत टाकले आहे. रविवारच्या घटनेनंतर ब्रिटिश सरकारने चिंता व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे संयुक्त राष्ट्रांकडूनही म्यानमारच्या लष्कराने लोकांनी निवडून दिलेल्यांच्या हाती पुन्हा सत्ता सोपवावी असे आवाहन केले आहे. 
म्यानमारमध्ये फेब्रुवारीमध्ये सत्ता उलथवण्यात आली होती. म्यानमारच्या लष्कराने देशावर ताबा घेतला होता तसेच लोकांनी निवडून दिलेल्या सरकारला बेदखल केले होते. आंग सान सू यांच्यासह मोठ्या नेत्यांना तुरुंगात डांबले आहे. यानंतर लोकांमध्ये सैन्याविरोधात उद्रेक पहायला मिळाला. लोक रस्त्यावर उतरले असून आंग सान सू यांना सोडण्याची मागणी करत आहेत. 


गेल्या काही दिवसांपासून सैन्याने आक्रमक रुप घेत आंदोलन चिरडण्यासाठी आंदोलकांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर विरोधात पोस्ट टाकल्यासदेखील कारवाई केली जात आहे. आतापर्यंत तिथे 2156 लोकांना अटक करण्यात आली आहे. 

Web Title: Security forces killed 51 protesters in Myanmar after set fire of Chinese factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.