उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांचे सचिव श्रीराम जोशी यांच्या चेंबरमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या अफवेने, बुधवारी सकाळी खळबळ उडाली. पोलिसांसह बॉम्बशोधक पथके तेथे तैनात झाली. तब्बल दोन ते अडीच तासांच्या तपासणीत तेथे काहीही आढळून आले नाही. ...
नागपूर : विविध सिंचन प्रकल्पांचे कंत्राट मिळविणा-या बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कागदपत्रांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करून सहा आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य शासनाला दिले. ...
गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमधील सात वर्षांच्या विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी समूह संस्थापक आॅगस्टाईन पिंटो आणि समूहाच्या व्यवस्थापकीय संचालक ग्रेस पिंटो यांना उच्च न्यायालयाने तात्पुरता दिलास देत, बुधवारपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. ...
गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमधील सात वर्षांच्या विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी शाळा समूहाचे विश्वस्त व त्यांच्या कुटुंबीयांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर मंगळवारी सुनावणी घेण्यात येणार आहे. ...
अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यातील आरोपी रमेश कदम हे कारागृहात गटबाजी करून कैद्यांना कारागृह प्रशासनाविरुद्ध भडकवत असल्याचे सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी एका अहवालात म्हटले आहे. ...
शिफु सनकृतीचा प्रमुख सुनील कुलकर्णी याच्यावर दोन मुलींच्या पालकांनी बलात्काराचा आरोप केला आहे. हा आरोप आणि उपलब्ध असलेले पुरावे लक्षात घेऊन कुलकर्णीवर बलात्काराचा गुन्हा नोंदविण्याबाबत विचार करा, अशी सूचना उच्च न्यायालयाने गुन्हे अन्वेषण विभागाला सोम ...
आपली मुलं कुठे जातात? काय करतात? यावर लक्ष ठेवणे पालकांची जबाबदारी नाही का? प्रत्येक गोष्टीत सरकारने आणि न्यायालयानेच काहीतरी करावे, अशी अपेक्षा केली जाऊ शकत नाही ...
मुंबई विद्यापीठाने सहाव्यांदा निकालाची दिलेली मुदत पुन्हा चुकविली असून उत्तरपत्रिका तपासण्याचे काम माणसे करत आहेत रोबोट नाही, हे लक्षात घ्यावे. आम्ही बहुतांशी काम संपवले आहे, असे अजब स्पष्टीकरण विद्यापीठाने निकालाच्या विलंबावर उच्च न्यायालयात दिले. ...