मेट्रो-३ प्रकल्प नागरिकांच्या हिताचा असल्याचा दावा सरकार करत असले तरी या प्रकल्पामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत आहे. त्याचबरोबर शहरात पाणी साचणे, वीज जाणे असे अनेक प्रकार घडत आहेत. ...
जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या करण्याचे अधिकार एका सहायक शिक्षकाला देण्यात आले होते. या शिक्षकामार्फत रात्री-अपरात्री व्हॉट्सअॅपवर बदलीचे आदेश इतर शिक्षकांना पाठवले जात होते. ...
पनवेल व रायगड जिल्ह्यांतील ३०० गावांमध्ये पाण्याची कमतरता असल्याने या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी तातडीने पावले उलचण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने जलसिंचन विभागाला या आठवड्यात दिले आहेत. ...
वैद्यकीय शाखेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीची प्रकृती ठीक नसल्याने, तिला सांगलीच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातून मुंबईच्या वैद्यकीय महाविद्यालयात बदली करून देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात दिला. ...
ठाणे महापालिकेला खासगी भूखंडावर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास स्थानिक न्यायालयाने केलेली मनाई उच्च न्यायालयानेही काही दिवसांपूर्वी कायम केली. स्थानिक न्यायालयापाठोपाठ उच्च न्यायालयानेही ठामपाला दिलासा देण्यास नकार दिला आहे. ...