टीव्हीवर प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या ‘महाभारत’ या मालिकेत पितामह भीष्माची भूमिका साकारणारे अभिनेता मुकेश खन्ना यांनी आपल्या अभिनयाने सर्वांच्याच मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘शक्तिमान’ या मालिकेमुळे मुकेश खन्ना टेलिव्हिजनवरील बच्चेकंपनीचे आवडते सुपरहिरो बनले आणि घराघरात पोहोचले. त्यापूर्वी भीष्म पितामह सारखी कर्मठ भूमिका साकारून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.सौगंध,तहलका, बेताज बादशाह आणि सौदागर अशा काही चित्रपटांतही त्यांनी काम केले. परंतु १९८०च्या दशकात बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ने मुकेश खन्ना यांनी एक वेगळीच उंची गाठली. त्यानंतर १९९७ मध्ये आलेल्या ‘शक्तिमान’ मालिकेतून त्यांनी साकारलेला ‘शक्तिमान’ आणि ‘गंगाधर’ या व्यक्तिरेखा आजही अनेकांच्या मनात कायम आहे. Read More
मुकेश खन्ना यांनी मुलाखतीत तिच्या संस्कारावर भाष्य केलं होतं. त्यानंतर अभिनेत्रीने त्यांना सडेतोड उत्तर दिलं होतं. आता शत्रुघ्न सिन्हा यांनीदेखील मुकेश खन्ना यांना सुनावलं आहे. ...
Mukesh Khanna And Ranveer Singh : ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांचा 'शक्तिमान' शो खूप चर्चेत होता. यामध्ये त्यांनी सुपरहिरोची भूमिका साकारली होती. अलिकडेच मुकेश खन्ना यांनी 'शक्तिमान' चित्रपटात रणवीर सिंगला मुख्य भूमिकेसाठी नकार दिल्याबद्दल सांगितले. ...