महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
विलिनीकरण हा विषय नाही. राज ठाकरेंनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला आहे. तो चालवणे सोपे नसते. त्यांची इच्छा आहे आपण एकत्र लढावे, तर आम्हीही त्यांना प्रतिसाद दिला आहे असं संजय राऊतांनी म्हटलं. ...
सध्या युतीबाबत कोणतीही विधाने करू नका, अशा स्पष्ट सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. ...
राज ठाकरे महायुतीसोबत आले नाहीत तरी चालतील; पण त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्रितपणे मुंबई महापालिका लढू नये, असा प्रयत्न शिंदेसेनेकडून होत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. ...
उद्धवसेनेला मोठी गळती लागली असून, मुंबई महापालिका राखणे ठाकरेंना आव्हानात्मक ठरू शकते. तर, महायुती पूर्ण ताकद लावून शह देण्याच्या प्रयत्नात आहे. अशातच मनसेची भूमिका महत्त्वाची ठरू शकते, असे म्हटले जात आहे. ...