राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
जिल्हा परिषद सेस फंडातून स्लरी फिल्टर, बीज प्रक्रिया ड्रम, सोयाबीन टोकण यंत्र अनुदानावर डीबीटी तत्त्वावर देण्यात येणार आहे, तसेच रब्बी, हरभरा पिकासाठी जिवाणू संवर्धक संघ एक हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार आहे. ...
गेल्या काही दिवसांपूर्वी परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील तीनपैकी सांजूळ आणि फुलंब्री हे दोन मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून त्याच्या सांडव्यातून पाणी वाहत आहे. मात्र, वाकोद प्रकल्पात केवळ ४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. ...
लातूर शहरातील पूर्वभागात बुधवारी सकाळी ७.३० ते ८ वाजण्याच्या सुमारास भूगर्भातून आवाज येऊन जमीन हादरली. त्यामुळे भयभीत होऊन नागरिक घराबाहेर पडले. भूकंपाच्या आठवणी ताज्या झाल्या. ...
लातूर शहरासह केज, अंबाजोगाई, धारूर, कळंब या मोठ्या शहरांना पाणीपुरवठा करणारे मांजरा धरण ७७.३२ टक्के भरले आहे. पाणीपातळी ६४१.३९ मीटर झाली आहे. धरणात एकूण पाणीसाठा १८३.९६४ दलघमी झाला आहे. यातील जिवंत पाणीसाठा १३६.८३४ दलघमी आहे. ...
ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जालना जिल्ह्यात शंभरावर टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. ३० आणि ३१ ऑगस्ट रोजी चोवीस तासांत इतका पाऊस झाला की, जिल्ह्यातील सर्व नदी-नाले, ओढे दुथडी भरून वाहू लागले! नद्यांना पूर आला. ...