सरस्वतीचे साधक, देशभरातील गणमान्य लेखक ताजेतवाने चेहरे घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य मांडवात बोलत होते, ऐकत होते. अन् त्याच मांडवाच्या दारात शे-दोनशे कष्टाचे पाईक मात्र मजुरीविना तळमळत होते. ...
सोलापूर जिल्ह्यातील एका प्रसिध्द नाट्य कलावंताला यवतमाळातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कुठलेही निमंत्रण नाही. असे असले तरी, त्याने याठिकाणी हजेरी लावून गाडगेबाबांच्या वेशात शेतकऱ्यांच्या व्यथेसह अनेक ज्वलंत प्रश्न मांडण्याचा प्रयत्न चालविला ...
प्रज्ञावंत नयनतारा सहगल यांचे न वाचलेले भाषण आणि आयुष्यात पहिल्यांदाच वैशाली येडे यांनी केलेले भाषण... या दोन्ही भाषणांनी साहित्य संमेलनाचा पहिला दिवस गाजवून टाकला. संकुचित मनोवृत्तीच्या व्यवस्थेला या दोघींनीही अक्षरश: ‘येडे’ ठरविले. ...
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी शुक्रवारी यवतमाळात आलेले शिक्षण तथा सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांना चौफेर विरोधाचा सामना करावा लागला. ...
अडचणीत आलेल्या तोरना, मरनाले दिल्लीची नाही, गल्लीतलीच बाई कामी येते, हे पुन्हा सिद्ध झालं, अशा शब्दात आपले मनोगत ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटक आत्महत्याग्रस्त शेतकरी सुधाकर येडे यांच्या पत्नी वैशाली येडे यांनी व्यक्त केले. ...
ख्यातकीर्त लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्याचा वाद सुरू असतानाच शुक्रवारी संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रती ‘नयनतारां’ना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यामुळे या सोहळ्यालाही डाग लागला. ...