माझ्यासारख्या असंख्य साहित्यिकांनी या संमेलनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच यवतमाळ पाहिले. पण हे गाव आम्हा साहित्यिकांना खूप आवडले. या संमेलनावर संकट ओढवले होते. पण यवतमाळकरांच्या जिद्दीच्या बळावर संमेलन यशस्वी झाले. ...
भाषा टिकविण्याची जबाबदारी शिक्षक तसेच अभ्यासक्रम मंडळाची आहे. मात्र अभ्यासक्रम मंडळाच्या नेमणुकीत मोठ्या प्रमाणात राजकारण चालते. या विद्यापीठीय राजकारणामुळेच राज्यातील भाषा शिक्षणाची दुरवस्था झाली आहे, अशी टीका प्राचार्य डॉ. रमेश जलतारे यांनी केली. ...
नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या साहित्यालाही गुणवत्तेचे निकष असायला पाहिजेत, अशी अपेक्षा डॉ. जयंत कुलकर्णी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली. ...
विदर्भातील संमेलन हा घरचा कार्यक्रम असल्यामुळे मी येथे आले आहे. पुन्हा असे घडू नये, याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेविका डॉ. राणी बंग यांनी रविवारी ‘प्रतिभावंतांच्या सहवासात’ या कार्यक्रमात सहगल प्रकरणाचा समाचार घेतला. ...
‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निषेध नोंदवा, बहिष्कार नको’, असे आवाहन मान्यवर साहित्यिकांनी संमेलनाच्या आदल्या दिवशी केले होते. मात्र, असे आवाहन केलेला एकही साहित्यिक यवतमाळला फिरकला नाही. ...
समाजातील झुंडशाहीचा वाढता उपद्रव हा निरनिराळ्या क्षेत्रात डोके वर काढत आहे. याची त्वरित राज्य व केंद्र शासनाने गंभीर दखल घ्यावी. अशा उपद्रवी प्रवृत्तीचा तातडीने बंदोबस्त करावा अशी प्रमुख मागणी खुल्या अधिवेशनात करण्यात आली. ...