मराठी भाषा दिन ( Marathi Bhasha Din ) : ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ’मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय १९९९ वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ’जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ह्या दोन्ही सुदिनांचे औचित्य साधून विविध मराठीप्रेमी संस्थांकडून २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा ’मायबोली मराठी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो. Read More
प्रख्यात कवी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.वा.शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून बुधवारी (दि.२७) सर्वत्र साजरा करण्यात आला. यानिमित्ताने डहाके यांनी सपत्नीक कुसुमाग्रज प्रतिष्ठानसह कुसुमाग्रज स्मारकाला भेट दिली. ...
पिंपळगाव बसवंत : परिसरातील कुसुमाग्रज यांच्या जन्म भूमी असलेल्या शिरवाडे वणी गावात मराठी भाषा दिन व कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. ...
राज्याच्या तुलनेत अमरावती विभाग भाषा विषयात नापास असल्याचे दिसून आले. तर अमरावती विभागातील तिसरी ते पाचविच्या ५६ टक्के मुलांना पहिलीचे पुस्तक वाचता येत नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. ...
देवनागरी लिपीच्या सहाय्याने कोरकू या बोलीभाषेतून मराठी शिकविण्याचा उल्लेखनीय प्रयत्न केला, ज्यामुळे येथील कोरकू आदिवासी मुलं वर्षभरात मराठी बोलू व वाचू लागली. ...
अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी केंद्र सरकारच्या दरबारी गेली चार वर्षे झगडावे लागत आहे. मराठी राज्यकर्त्यांसह सर्वच स्तरावर उदासिनता असल्याने आवश्यक ते सर्व लिखित पुरावे देऊनही मराठी भाषेच्या पदरी निराशाच आली आह ...