मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी मागासवर्ग आयोगाच्या अहवालाची वाट न पाहता आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केली. विधिमंडळाला आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. ...
Maratha Reservation सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला सोमवारी चाकण येथे हिंसक वळण लागले. जमावाने एसटी, पुणे शहर वाहतूक सेवेच्या बस, कार, जीप व अग्निशमन बंबासह १६ वाहने पेटविली. शंभरावर वाहनांची तोडफोड झाली. ...
मराठा समाजाला आरक्षणासह विविध मागण्यांसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने विहितगाव येथे सोमवारी आमदार योगेश घोलप यांच्या घरासमोर तीन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...
मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा २४ तासांत कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. ...
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासाठी जिल्ह्यात पुकारलेल्या आंदोलनामुळे सलग सहा दिवस एस.टी. महामंडळाची बस आगारातून बाहेर पडली नव्हती. सातव्या दिवशी म्हणजेच सोमवारी जिल्ह्यातील चारही आगारातून बस सुरु करण्यात आल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. ...
मराठा आरक्षणासाठी परळीत सुरु असलेले मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन तेराव्या दिवशीही सुरु होते. तर सोमवारी केज तालुक्यातील धनेगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करुन ३० जणांनी मुंडण केले. बीड येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन ...
राजगुरूनगर व चाकण येथे मराठा समाजाच्या वतीने महामार्गावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चा व रास्ता रोका शांततेत पार पडल्यानंतर काही वेळाने चाकण येथे काही तरुणांनी वाहनांवर दगडफेक व जाळपोळ केली. ...
चाकणमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी बंद पाळण्यात आला. मात्र, या बंदला हिंसक वळण लागल्याने वाहनांची तोडफोड व जाळपोळीच्या घटना घडल्या. त्याचा सर्वाधिक फटका पीएमपीला बसला आहे. ...