मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
गोव्याचे माजी मुखमंत्री आणि देशाचे संरक्षणमंत्री राहिलेल्या मनोहर पर्रीकर यांची आज जयंती. गोव्याच्या विकासात आणि देशाच्या सैन्य दलासाठीचे त्यांचे योगदान कायम स्मरणीय आहे. ...
Goa Assembly Election Results 2022: गोव्यात भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचा मुलगा अपक्ष म्हणून रिंगणात असून भाजपचा खेळ बिघडवताना दिसत आहे. उत्पल सध्या ट्रेंडमध्ये आघाडीवर आहेत. ...
Goa Election 2022 : पर्रीकरांनी एक सभा आयोजित केली होती. तेव्हा माझ्या तोंडून सहज एक शब्द आला होता काँग्रेसमुक्त भारत…आज हा शब्द देशाच्या कोट्यवधी नागरिकांचा संकल्प बनला आहे, असे नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. ...
उत्पल पर्रीकर यांनी पणजी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडे उमेदवारी मागितली होती; परंतु पक्षाने त्यांचा पत्ता कापून बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी दिली. ...