मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
गोव्यातील भारतीय जनता पक्षामध्ये थोडी खूशी, थोडा गम अशी स्थिती अजुनही आहे. भाजपाच्या ताब्यात असलेल्या दोन लोकसभा मतदारसंघांपैकी एक लोकसभा मतदारसंघ गमवावा लागल्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह भाजपाच्या कोअर टीमलाही दु:ख झाले. ...
ख्रिस्ती मतदारांनी तर भाजपकडे पूर्णपणो पाठ फिरवली. फक्त दाबोळी मतदारसंघात व अन्य एक दोन मतदारसंघांमध्ये ख्रिस्ती मतदारांची बऱ्यापैकी मते भाजपला मिळाली. ...
मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर उत्पल हे पणजीत भाजपाच्या तिकीटाचे दावेदार होते. मात्र भाजपाने त्यांना तिकीट नाकारले. या पार्श्वभूमीवर उत्पल व्यक्त झाले असावेत प्रकारची चर्चा सुरू झाली आहे. ...
माजी मुख्यमंत्री तथा पूर्व केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पणजी विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी आज मतदान सुरू आहे. ...
मनोहर पर्रीकर यांच्या हयातीत एकदा देखील पणजी विधानसभा मतदारसंघात पराभूत न झालेल्या भारतीय जनता पक्षाने यावेळी पणजीतील विजयाची आपली परंपरा कायम ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत ...