मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती. Read More
उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह ३ दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्याठिकाणी संजय राऊतांच्या सरकारी निवासस्थानी ठाकरे कुटुंबाचा मुक्काम आहे. ...
सोनिया गांधी म्हणाल्या की, देशातील वातावरण पक्षाच्या बाजूने आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही चांगली कामगिरी केली तर राष्ट्रीय राजकारणात मोठा बदल होईल. ...
पश्चिम बंगालमध्ये टीएमसी आणि काँग्रेसचे संबंध ताणल्याने राज्यात दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लोकसभा निवडणूक लढवली. मात्र तिथे काँग्रेसला फारशी कामगिरी करता आली नसल्याने पक्षांतर्गत कुरघोडीचं राजकारण सुरु झाले आहे. ...
खरे तर विरोधीपक्ष नेता म्हणून निवड झाल्यानंतर, ते अधिकच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. विरोधीपक्षनेता झाल्यापासून त्यांची जबाबदारीही वाढली आहे. त्यांना अनेक विध मुद्यांवर विरोधी पक्षांची भूमिका मांडावी लागत आहे. ...