संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ जणांच्या हौतात्म्यानंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. तेव्हापासून १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला होता. आज आपला हा महाराष्ट्र दिल्लीचंही तख्त राखतोय, ऐतिहासिक वारसा, संस्कृती-परंपरा जपतोय-जोपासतोय. Read More
छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या स्वप्नातील महाराष्ट्र साकारण्यासाठी अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. ...
आताच्या कोरोना महामारीचा सर्वाधिक प्रभाव महाराष्ट्रात दिसत असला, तरी त्यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यातही महाराष्ट्रच आघाडीवर असेल, अशी खात्री हीरक महोत्सवाच्या शुभेच्छा देताना नक्कीच वाटते. ...
स्त्रीशिक्षण, स्त्रीस्वातंत्र्य, उच्चशिक्षण, वैज्ञानिक संशोधन, तंत्रज्ञान यांबाबतीत पुरोगामी महाराष्ट्राने जी आघाडी घेतली आहे, त्यामध्येही शहरांची भूमिका महत्त्वाची आहे. ...
Maharashtra Day 2020 : महाराष्ट्र कायम इतर राज्यांच्या पुढेच राहिला. उद्योग, शिक्षण, साहित्य, क्रीडा या सर्वच क्षेत्रात महाराष्ट्रानं आपलं अग्रस्थान कायम राखलं.. देशाच्या विकासाचं इंजिन अशी महाराष्ट्राची ओळख. ...
Maharashtra Day 2020 : महाराष्ट्रात सांस्कृतिक व सामाजिक विविधता पाहायला मिळते. विशेष म्हणजे या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब येथील भाषांवरही दिसते. त्यामुळेच महाराष्ट्रात अगदी कोसाकोसावर भाषेचा लहेजा बदलत जातो. ...
महाराष्ट्राच्या विकासामध्ये चंद्रपूरचा मोलाचा वाटा असला पाहिजे. जेव्हा जेव्हा राज्याला गरज पडली तेव्हा तेव्हा या जिल्ह्याने पुढे येऊन मदत केली आहे. माजी मुख्यमंत्री मा.सा. कन्नमवार यांच्यापासून राज्याच्या मदतीला धावून जाण्याचे कार्य सुरू आहे. ...