Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
आगामी विधानसभा निवडणूक शांततेत पार पडण्यासह आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे, यासाठी पोलीस दलातर्फे गावातील प्रमुख मार्गांवरून सशस्र संचलन करण्यात आले. ...
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला केवळ आठवडा शिल्लक राहिला आहे. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने शहर पोलीस प्रशासन सज्ज झाले असून, निवडणुकीसाठी कोलकाता येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) दोन तुकड्या बंदोबस्तासाठी शहरात दाखल झाल्या आहेत. ...
भाजपने मागील पाच वर्षांत चुकीचे धोरण राबवून प्रगतिपथावर असलेला आपला देश भिकेला लावला असल्याची जाहीर टीका रिपब्लिकन सेनाचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी येथे केली. ...
विरोधकांचे तोंड दाबण्यासाठी या देशात सीडी आणि ईडीचा वापर भाजपाने सुरू केला आहे. त्याचा आधार घेऊन हे सरकार आजही राजकारण करीत आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी खासदार उदित राज यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेतून केला. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असलेल्या दक्षिण पश्चिम नागपूरकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्र्यांचा येथून १ लाखाहून अधिक मतांनी विजय व्हावा व मतदारसंघातून ‘ग्रॅन्ड हॅटट्रिक’ व्हावी यासाठी प्रचारयंत्रणा राबत आहे. ...