Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
कोल्हापूर जिल्ह्यांतील दहा मतदार संघात अत्यंत ईर्षेने ग्रामपंचायत निवडणूकीला होते तसे मतदान सोमवारी विधानसभा निवडणूकीसाठी झाले. राज्यात ५ वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर मतदारसंघात ७८. ३२ टक्के इतके झाले आहे. ...
प्रत्यक्ष मतदान संपण्याच्या तासभर आधी सायंकाळी ५ वाजेपर्यंत संपूर्ण नागपूर जिल्ह्यात ४९.०३ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी ४ वाजेनंतर प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसत होत्या. ...
Maharashtra Election 2019 Live : Voting Update And News From Mumbai Pune, Aurangabad, Satara, Sangli, Baramati Constituency In Marathi | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक लाइव बातम्या ...
विधानसभा निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यात सोमवारी पाच वाजेपर्यंत ६३ टक्के मतदान झाले. किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत सुरू होते. सायंकाळी पाचनंतर मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या. तर नगर, पारनेर परिसरात पाऊस सुरू झाल्याने मतदानासाठी व्यत्यय येत होता. ...
महायुतीचे ‘अब की बार २२० पार’ हे आता २५० टचपर्यंत मजल मारणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या दहाच्या दहा जागा येतील, बंडखोरीचा काही परिणाम होणार नाही, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे सांगितले. ...
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार गुलाबराव पाटील व भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्यातील लढत चुरस निर्माण करणारी ठरली ...