मंत्री पुत्रासह 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 05:43 PM2019-10-21T17:43:03+5:302019-10-21T17:49:54+5:30

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार गुलाबराव पाटील व भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे  यांच्यातील लढत चुरस निर्माण करणारी ठरली

20 to 25 people, including the minister's son, were charged in jalgaon | मंत्री पुत्रासह 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल

मंत्री पुत्रासह 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल

Next

जळगाव/धरणगाव - जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार गुलाबराव पाटील व भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे  यांच्यातील लढत चुरस निर्माण करणारी ठरली आहे. 18 ऑक्टोबर रोजी रात्री दीडच्या दरम्यान तालुक्यातील पाळधी-पथराड रस्त्यावर शिवसेनाभाजपाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. या प्रकरणी भाजपा कार्यकर्ते किशोर झवर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मंत्री पुत्र तथा जि.प.सदस्य प्रतापराव पाटील यांच्यासह 20 ते 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

18 ऑक्टोबरच्या रात्री दीड वाजेच्या सुमारास पथराड रस्त्यावर शिवसैनिकांनी वाद घालून मला व माझ्या साथीदाराला मारहाण केली. तसेच पाळधी दूरक्षेत्र पोलीस ठाण्यात जि.प.सदस्य प्रताप पाटील, राहुल ठाकूर आबा माळी आदी 20 ते 25 जणांनी आम्हाला मारहाण करुन चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचारासाठी भाड्याने लावलेली गाडी क्र.एमएच-15-बीएक्स-3813 ची तोडफोड केली. तसेच तुला 24 तारखेनंतर पाहू, असे धमकावल्याचे किशोर झवर यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. किशोर झवर यांनी उपचार घेतल्यानंतर दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे मतदानाच्या दिवशी जळगाव ग्रामीण मतदार संघात डीवायएसपी सौरभ अग्रवाल व इतर वरिष्ठ अधिकारी ठाण मांडून होते. तसेच तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, असे सपोनि पवन देसले यांनी सांगितले. पुढील तपास पाळधी ओपीचे सपोनि हनुमंत गायकवाड हे करीत आहेत. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेचे राहूल ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन किशोर झवर व नितेश पाटील यांच्याविरुद्ध पाळधी पोलिसात गुन्हा दाखल केला होता. निवडणुकीचा फड चांगलाच रंगलेला असला तरी निकालानंतर दोन गटात वाद उफाळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 

Web Title: 20 to 25 people, including the minister's son, were charged in jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.