विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राज्य सरकारने गत पाच वर्षात केलेल्या विकासकामांचा हिशेब जनतेपुढे मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ आॅगस्टपासून महाजनादेश यात्रा सुरु केली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या मोझरी येथून १ आॅगस्टला या यात्रेला सुरूवात झाली. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात १ ते ९ आॅगस्टदरम्यान यात्रा भ्रमण करणार असून १४ जिल्ह्यांमध्ये ती जाणार आहे. Read More
पुणे शहरात काही तासात दाखल होणारी भाजपच्या महाजनादेश यात्रेची तयारी पूर्ण झाली असून संपूर्ण शहरात आगामी विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्यांनी फ्लेक्सबाजी केली आहे. त्यामुळे यात्रा मार्गावर अक्षरशः इंचाइंचावर स्वागताचे फ्लेक्स बघायला मिळत आहेत ...
भाजपच्या तिसऱ्या टप्प्यातील महाजनादेश यात्रेला शुक्रवारपासून सुरुवात झाली असून आज यात्रा इंदापूर तालुक्यात दाखल होणार आहे. यावेळी हर्षवर्धन पाटील यात्रेचे स्वागत करणार आहेत. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्रव्यापी महाजनादेश यात्रेचे दोन टप्पे पूर्ण झाल्यावर शनिवारी ही यात्रा पुण्यात येणार आहे. शनिवारी संध्याकाळी हडपसरपासून सुरुवात करून शहरातला विविध भागात त्यांचा रोड शो होणार आहे. ...
राज्यातील भाजपा सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेली महाजनादेश यात्रा सोमवारी (दि. १६) व मंगळवारी (दि. १७) कोल्हापुरात येत आहे. या यात्रेचे स्वागत प्रचंड जनसमुदायाद्वारे करून या ...