यंदा शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांचे मोठे आव्हान उदयनराजे भोसले यांच्यापुढे आहे. राष्ट्रवादी-काँग्रेसच्या विरोधात भाजप-शिवसेना अशीच ही लढत ठरणार आहे. ...
लोकसभेच्या २०१९ च्या निवडणूक निकालाचे अंदाज व्यक्त करणाऱ्यांनी भलेही भाजपच्या पारड्यात मोठा विजय टाकला असला तरी ५४२ लोकसभा मतदारसंघांतील मतदानाची आकडेवारी हे दाखवते की २२७ मतदारसंघांत कमी मतदान झाले आहे ...
तालुक्यातील लिंबाळा येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहिर होणार आहे. त्यामुळे महाविद्यालयीन परिसरात प्रशासनाकडून पूर्वतयारी करण्यात आली. मात्र हिंगोली शहरवासियांना निकाल ऐकण्यासाठी मात्र शहराबाहेर जावे लागणार आहे. ...
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये माहिती व तंत्रज्ञान इमारत शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय बाबानगर या मतमोजणी केंद्रापासून २०० मीटर परिसरामध्ये मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, मतमोजणीच्या ...