घरात दिवसा लपून बसलेल्या बिबट्याने एका शेतक-यावर हल्ला केला. परंतु या धाडसी शेतक-याने बिबट्याशी झटापट करून त्याला घरातच कोंडून ठेवले. ही घटना अकोले तालुक्यातील कोतूळ परिसरातील मोग्रस येथे शनिवारी दुपारी घडली. ...
नाशिक : गांधीनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल (कॅट्स)च्या हेलिकॉप्टर उड्डाणाच्या धावपट्टीपासून अगदी दीडशे ते दोनशे मीटर अंतरावर असलेल्या गवताळ भागात वनविभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात शनिवारी (दि.२९) सकाळी बिबट्या जेरबंद झाला. ...
वणी : चिलबारी शिवारात उपचार करून दुचाकीने घराकडे परतणाऱ्या वृद्ध व्यक्तीवर बिबट्याने हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी वणी ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्र वारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. ...
शेतामध्ये पिकाला पाणी पाणी देत असताना बिबट्याने युवकावर हल्ला केल्याची घटना राजुरी येथे शुक्रवारी (दि.२८ फेब्रुवारी)सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात युवक जखमी झाला आहे. ...
बिबट्याने हल्ला करीत तीन शेळ्या ठार केल्या. नांदलापूर, ता. कऱ्हाड येथील राजाराम शिर्के यांच्या वस्तीवर मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, भरवस्तीत बिबट्याने शेळ्यांवर हल्ला चढविल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले ...