आष्टी पेपर मिल परिसरात बिबट्याची पिल्ले आढळून आल्यानंतर वनविभागाने पिंजरा लावून त्यात पिलांना ठेवले होते; परंतु बिबट मादी पिंजऱ्यात आली नाही. मादी इतरत्र जंगलात फिरत आहे. दोन दिवसांपूर्वी येथील नदीकाठावर फिरत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. ...
शनिवारी एक बिबट रात्री ७ वाजताच्या सुमारास चिचगाव येथील लोकवस्तीत शिरला. यावेळी बिबट्याने बळीराम दोनाडकर नामक एका शेतक-याच्या गोठ्यात बांधलेल्या शेळीवर हल्ला करीत त्याची शिकार केली. ही बाब शेळीपालक कुटुंबासह गावक-यांना दिसून येताच बिबट्याला हाकलून ला ...
शिवराम काशीराम लोधी (वय ६५) यांचा मोरगाव शिवारात गट क्रमांक-३५८ मध्ये कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे. या पोल्ट्री फार्मच्या देखरेखीसाठी त्यांनी लेब्रो जातीचा कुत्रा पाळला होता. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास या पोल्ट्रीफार्मवरील गडी जेवणाकरिता घरी गेले. ८ ...
गिरणारे गावाजवळील वाडगाव शिवारात मागील महिन्यात रात्री बिबट्याने एका चिमुकलीवर हल्ला करत ठार मारले होते. या घटनेने परिसरात बिबट्याची दहशत पसरली होती. पूर्व-पश्चिम वनविभागाने वाडगाव पंचक्रोशीच्या परिसरात पिंजऱ्यांची तटबंदी करत बिबट्याला जेरबंद करण्यास ...
भडाणे व पिंपळकोठे परिसरात बिबट्याच्या जोडीने धुमाकूळ घातला असून शनिवारी (दि.१६) रात्री एका शेतमजुराच्या शेळीला फस्त केल्याची घटना घडली. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
झडशी शिवारातील चारगाव व बोरखेडी तसेच परिसरातील शेतशिवारात तब्बल चार वर्षांपासून बिबट वास्तव्य करीत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. अनेकदा तर शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शनही झाले. बिबट मानवावर हल्ला करीत नाही या समजुतीने आतापर्यंत शेतकऱ्यांनी मनावर घेतले ...
गेल्या आठवड्यात बदलापूरच्या कात्रप डोंगरावर बिबट्याचा वावर असल्याचे उघड झाले होते. त्या बिबट्याचे पायाचे ठसे देखील वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सापडले होते. ...