Kolhapur Flood News And Updates in Marathi: कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ, आर्मी आणि नेव्हीची पथके दाखल झाली आहेत. जिल्ह्यातील 204 गावांमधून 11 हजार 432 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. Read More
कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी दिवसभर उघडीप राहिली, धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने विसर्ग कमी झाला आहे. परिणामी, पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले आहे. पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात फुटाने कमी झाली असून, ३९ फुटांपर्यंत खाली आली आहे. ...
Radhanagari Water Update : गेल्या चार दिवसांच्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे शनिवारी उघडले असून धरणातून भोगावती नदीपात्रात एकूण ५७८४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे. ...
अलमट्टी जलाशयाची उंची वाढवल्यानंतर सांगली, कोल्हापूरला जिल्ह्यांना महापुराचा कोणताही धोका होत नाही. महाराष्ट्रातील राजकीय नेते आपल्या स्वार्थासाठी आरोप करत असल्याची टीका कृष्णा नदी आंदोलन समितीचे कर्नाटक राज्य अध्यक्ष व निराणी उद्योग समूहाचे प्रमुख स ...
कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी दिवसभर पावसाची उघडीप राहिली. गगनबावडा, शाहुवाडी तालुक्यात काही प्रमाणात पावसाची रिपरिप सुरू आहे. धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने विसर्ग तुलनेत कमी आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहूवाडी तालुक्यात शुक्रवारी दिवस-रात्र पावसाचा जोर वाढला होता. तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने कडवी आणि शाळी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. काही ठिकाणी पाणी नदीपात्राच्या बाहेर आले आहे. ...
आजरा तालुक्यात शुक्रवार रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पावसामुळे साळगाव बंधारा सहाव्यांदा पाण्याखाली गेला आहे. तालुक्यातील सर्व प्रकल्प जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच भरले आहेत. ...