कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील. Read More
बेळगाव जिल्ह्यातून लक्ष्मण सवदी आणि शशिकला अण्णासाहेब जोल्ले यांनी कर्नाटक मंत्रिमंडळाचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. इतर सर्व इच्छुकांना फाटा देण्यात आला आहे, त्यामुळे नाराजी वाढणार असल्याची शक्यता आहे. ...
आमदार शशिकला जोल्ले यांनी कर्नाटक मंत्रीमंडळाच्या कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेताच निपाणी मतदार संघात भाजप कार्यकर्त्यानी फटाके फोडून व गुलाल उधळून जोरदार जल्लोष केला. खातेवाटप झाले नसले तरी त्यांना महिला व बालकल्याण खाते मिळू शकते. ...
निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांनी आज कर्नाटक मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून पद व गोपनियतेची शपथ घेतली. निपाणी मतदार संघाचे दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करताना त्यांना भाजपाने मोठी संधी दिली आहे. ...
कर्नाटक निवडणुकीमध्ये भाजपाला जास्त जागा मिळाल्या होत्या. मात्र, बहुमत न मिळाल्याने येडीयुराप्पा यांनी स्वत:ला मुख्यमंत्री घोषित करूनही बहुमत सिद्ध करता आले नव्हते. ...