कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील. Read More
एखाद्या इमारतीचा पाया खचला, तर कळसाची अवस्था ही कधीही कोसळेल, अशी हाेते, तसेच कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत घडले. भाजपच्या पक्षश्रेष्ठींना उंच उंच मनोऱ्यावरील कळसाच्या तळपण्यावर लाेकांची मते सहज जिंकून घेऊ, असे अतिआत्मविश्वासाने सांगितले गेले. मात्र ...
भाजप आणि काँग्रेसमधील सत्तासंघर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याभोवती केंद्रित झाला असला, तरी गेल्या सहा महिन्यांपासून त्याला जे. पी. नड्डा आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यातील स्पर्धेचीही किनार लाभली आहे. ...
माेदी सरकारला ९ वर्षे पूर्ण हाेणार आहेत. मात्र, कर्नाटकमधील पराभवामुळे या आनंदावर विरजण पडले आहे. हा जल्लाेष साजरा करण्याची तयारी सुरू असतानाच कर्नाटकच्या पराभवामुळे पक्षात निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
रणदीप सुरजेवाला यांनी आपले विश्वासू प्रोफेसर गौरव वल्लभ यांच्याकडे मीडियातील प्रचाराची रणनीती ठरवण्याचे काम सोपविले होते. यातूनच ४० टक्के कमिशन, पाच आश्वासने, नंदिनी दूध तसेच महागाई आदी स्थानिक मुद्द्यांना केंद्रस्थानी धरून प्रचाराची रणनीती आखली होती ...
पक्षाचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या आमदारांमध्ये लोकप्रिय आहेत तसेच राहुल गांधी यांच्या पसंतीचे मानले जातात. दुसरे वरिष्ठ नेते डी. के. शिवकुमार मल्लिकार्जुन खरगे यांच्या खास मर्जीतील आहेत. ...