ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत. Read More
काँग्रेसच्या नेतृत्वावर शिंदे नाराज आहेत. ते जर भाजपात आले तर गमावलेले मोठे राज्य पुन्हा भाजपाच्या ताब्यात येईल, असे अमित शाहा यांना सांगण्यात आले. ...
मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात मोदीजी तुम्ही पेट्रोल-डिजेलच्या दरात जागतीक पातळीवर 35 टक्क्यांनी झालेली घसरण विसरून गेले आहात. ...
जगभरात थैमान घालत असलेल्या कोराना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोल आणि डिजेलच्या दरात मोठी घसरण झाली आहे. या घसरणीचा फायदा सर्वसामान्यांना व्हावा, अशी मागणी करण्यात येत आहे. या घडामोडींचा धागा पकडून राहुल यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले आहे ...
मध्य प्रदेशातील काँग्रेस आणि कमलनाथ यांचे सरकार कायम राहणार आहे. येत्या 16 मार्च रोजी तुम्हाला हे दिसून येईल. काँग्रेसच्या आमदारांची संख्या तुम्हाला पूर्वीऐवढीच दिसून येईल, असा दावा आमदार अर्जुन सिंग यांनी केला आहे. ...