मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली. Read More
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) बुधवारी इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना वार्षिक करारातून बाहेर केले आणि या निर्णयावर सध्या समिश्र प्रतिक्रिया येत आहेत. पण, हा योग्य निर्णय असल्याचे मत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने ( Sourav Ganguly) व्यक ...