मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली. Read More
BCCI's Annual Contracts 2025-26: बीसीसीआयने नव्या वर्षासाठीच्या मध्यवर्ती वार्षिक करारांची यादी प्रसिद्ध केली आहे. गतवर्षी करारामधून वगळलेल्या श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांचं झालेलं पुनरागमन हे या करारांचं मुख्य वैशिष्ट्य ठरलं आहे. ...