कोयना धरणातून सोडलेले एक टीएमसी पाणी बुधवारी सांगलीत पोहोचेपर्यंतच संपले. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणखी दोन टीएमसी पाणी सोडण्याची विनंती केल्यामुळे कोयनेतून अखंडित एकूण तीन टीएमसीपर्यंत पाणी सोडण्यात येणार आहे. ...
उपलब्ध पाणी साठ्यातून रब्बीचे व पिण्याच्या पाण्याचे दोन आवर्तन माहे फेब्रुवारी २०२४ अखेरपर्यंत पुरेसा राहील या पद्धतीने पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. ...
रब्बी हंगामासाठी म्हैसाळ योजनेचे पंप येत्या १७ नोव्हेंबर रोजी सुरू होतील, तर टेंभू योजनेचे पंप येत्या १५ डिसेंबर रोजी सुरू होतील. त्यानंतर टेंभूचे पाणी १५ जानेवारीपर्यंत सांगोला तालुक्यातील लाभक्षेत्रात पोहोचणार. ...