नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्राच्या पुत्राला वीरमरण आले आहे. कौस्तुभ राणे असे या शहीद जवानाचे नाव असून ते नवी मुंबईतील शितल नगर येथे राहात होते. ...
काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात सुरू करण्यात आलेल्या मोहिमेला आज मोठे यश मिळाले असून, कुपवाडा येथील लोलाब येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. ...
अमेरिकी काँग्रेसच्या सदस्या अॅन वॅग्नर यांनी संसदीय समितीपुढील सुनावणीत डोकलाममध्ये चिनी सैन्याने पुन्हा मोर्चेबांधणी सुरु केल्याचे विधान केले होते. त्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने हा खुलासा केला. ...