2017मध्ये भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा पाच जानेवारीपासून सुरू झाला आहे. 24 फेब्रुवारीला टी-20 सामन्याद्वारे भारताचा द.आफ्रिका दौऱ्याचा समारोप होणार आहे. आफ्रिकेविरोधात भारत तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. आफ्रिकेत झालेल्या सहापैकी पाच मालिका भारताने गमविल्या असून एक मालिका अनिर्णीत राखण्यात यश आले होते. भारताने 1992 पासून द. आफ्रिका दौ-यात 17 कसोटींपैकी केवळ दोन सामने जिंकलेत. Read More
भरवश्याच्या फलंदाजांनी आपल्या विकेट फेकल्यानंतर भुवनेश्वरच्या साथीनं हार्दिकने(93) भारताची इज्जत राखली. हार्दिक पांड्यांच्या अर्धशतकाच्या बळावर भारतानं 209 धवापर्यंत मजल मारली. पहिल्या डावात भारत आणखी 77 धावांनी पिछाडीवर आहे. ...
मुरली विजय, शिखर धवन आणि विराट कोहली हे आघाडीचे भारतीय फलंदाज तंबूत परतले आहेत. भारताने दक्षिण आफ्रिकेला 286 धावांवर रोखले होते. भारतीय संघ अजूनही 258 धावांनी पिछाडीवर आहे. ...
लग्नानंतर पहिलाच कसोटी सामना खेळणारा कर्णधार विराट कोहली (5) धावांवर स्वस्तात बाद होताच सोशल मीडियाने पुन्हा एकदा अनुष्का शर्माला जबाबदार धरले आहे. सोशल मीडियावर पत्नी अनुष्का शर्मावरुन विराट कोहलीला ट्रोल केले जात आहे. ...
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील पहिल्या कसोटीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण हा निर्णय त्यांच्या चांगलाच अंगलट आला. ...