2017मध्ये भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा पाच जानेवारीपासून सुरू झाला आहे. 24 फेब्रुवारीला टी-20 सामन्याद्वारे भारताचा द.आफ्रिका दौऱ्याचा समारोप होणार आहे. आफ्रिकेविरोधात भारत तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. आफ्रिकेत झालेल्या सहापैकी पाच मालिका भारताने गमविल्या असून एक मालिका अनिर्णीत राखण्यात यश आले होते. भारताने 1992 पासून द. आफ्रिका दौ-यात 17 कसोटींपैकी केवळ दोन सामने जिंकलेत. Read More
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिस-या कसोटी सामन्यात आणि पहिल्या वनडेमध्ये भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टीम इंडियाच्या नावाने बोटे मोडणा-या क्रिकेट विश्लेषकांचा समाचार घेतला आहे. ...
दक्षिण आफ्रिकेत पहिल्या वनडेमध्ये डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने दमदार कामगिरी केली. या कामिगिरीचे श्रेय त्याने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला दिले आहे. ...
दक्षिण आफ्रिकेवर सहा विकेट्सनी विजय मिळवणाऱ्या टीम इंडियावर आणि शतकवीर कर्णधार विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव होत असला, तरी एका बाजूने किल्ला लढवणारा अजिंक्य रहाणेही या विजयाचा एक शिल्पकार आहे. ...
विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विक्रमी ३३वे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक झळकावले. या शानदार कामगिरीसह त्याने आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानही पटकावले. ...
कसोटी मालिका गमावणाऱ्या भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दणक्यात सुरुवात केली आहे. कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेने तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या 189 भागीदारीच्या जोरावर भारताने दर्बान येथे झालेल्या पहिल्या वनडेत दक्षिण ...
द.आफ्रिका आणि भारत यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात द. आफ्रिकेच्या संघाने भारतीय संघाला 270 धावांचे आव्हान दिले आहे. या सामन्यात द. आफ्रिकेने कर्णधार फाफ डु प्लेसिसच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर आठ बाद 269 धावा केल्या आहेत. ...