२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. Read More
‘इंडिया’ आघाडीतर्फे देशव्यापी संयुक्त जाहीर सभांचा धडाका लावला जाईल आणि त्याची सुरुवात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भोपाळपासून होईल, अशी घोषणा दिल्लीत १३ सप्टेंबर रोजी झालेल्या ‘इंडिया’च्या समन्वय समितीने केली होती. ...
टीएमसी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने नरमाईची भूमिका घेतली असतानाही, काँग्रेसकडून टीएमसीचे राष्ट्रीय महासचिव तथा पक्षाचे लोकसभा सदस्य अभिषेक बॅनर्जी यांना निशाणा केले जात असल्याने तृणमूल काँग्रेसचे नेतृत्व नाराज आहे ...