INDIA Opposition Alliance News, मराठी बातम्याFOLLOW
India opposition alliance, Latest Marathi News
२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. Read More
Uddhav Thackeray Criticize BJP: इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी आज महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. ...
आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका कक्कर यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना विरोधी पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार बनवा अशी मागणी केली आहे. ...
ब्रिटीशही देशाचा विकास करत होते, परंतु हुकुमशाही होती. आम्हाला विकासापेक्षा स्वातंत्र्य हवे. कुठल्याही हुकुमशाहाला भारतमातेच्या पायात बेड्या घालायला देणार नाही असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. ...
Mayavati Vs India Alliance: बसपा प्रमुख मायावती यांनी आज स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा करत भाजपाचा बालेकिल्ला बनलेल्या उत्तर प्रदेशात विरोधी ऐक्य साधण्याच्या प्रयत्नात असलेल्या इंडिया आघाडीच्या प्रयत्नांना सुरुंग लावला आहे. ...
'I.N.D.I.A.' Alliance: विरोधी पक्षांच्या I.N.D.I.A. आघाडीची बैठक गुरुवारपासून मुंबईत सुरू होत आहे. या बैठकीमध्ये आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपाबाबत काही आराखडा निश्चित होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. ...