आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांची भारतीय आॅलिम्पिक संघटनेच्या (आयओए)अध्यक्षपदी गुरुवारी निर्विरोध निवड झाली. राजीव मेहता हे देखील पुढील चार वर्षांच्या दुस-या कार्यकाळासाठी महासचिवपदी निर्वाचित झाले आहेत. ...
भारतीय आॅलिम्पिक संघटनेच्या (आयओए) गुरुवारी होणाºया वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांच्या नावाची ‘आयओए’च्या अध्यक्षपदी शिक्कामोर्तब होणार आहे. ...
भारतीय संघाला आपल्या कामगिरीत सातत्य राखण्यासाठी मेहनत करावी लागणार आहे, असे मत हॉकी विश्व लीगमध्ये कांस्यपदक पटकाविणा-या भारतीय संघाचे प्रशिक्षक शोर्ड मारिन यांनी व्यक्त केले. ...
सामना संपण्यास दोन मिनिटे शिल्लक असताना ब्लॅक गोव्हर्सने नोंदवलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने आॅलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनाचे कडवे आव्हान २-१ गोलने परतावले आणि हॉकी विश्व लीग स्पर्धेचे जेतेपद कायम राखले. ...
पावसात झालेल्या उपांत्य सामन्यात आॅलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनाकडून ०-१ ने पराभूत झालेला भारतीय संघ आज रविवारी विश्व हॉकी लीगमधील तिस-या स्थानासाठी होणारा सामना जिंकून कांस्य कायम राखण्याच्या निर्धाराने खेळणार आहे. ...
अत्यंत रोमांचक झालेल्या सामन्यात अर्जेंटिनाचा भक्कम बचाव भेदण्यात आलेल्या अपयशामुळे विश्व हॉकी लीग स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात यजमान भारताला ०-१ असा पराभव पत्करावा लागला ...