अकोला: उन्हाचा पारा सध्या आपलेच रेकॉर्ड मोडतो आहे. परिणामी, उष्माघात आणि त्यामुळे मृत्यू होण्याची भीतीही वाढली आहे. यापासून स्वत:चा बचाव करायचा असेल, तर शरीराचे तापमान संतुलित राखण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. ...
नाशिक, अहमदनगर, जळगाव, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये या चार दिवसांपासून उष्णतेची लाट अधिक तीव्र स्वरूपात जाणवत आहे. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. ...
उष्णतेच्या तीव्र लाटेने महाराष्ट्र सलग तिसऱ्या दिवशी शनिवारी होरपळला. अकोला येथे पुन्हा सर्वाधिक ४६.७ अंश सेल्सिअस अशा जगातील विक्रमी तापमानाची नोंद झाली. ...
पाटोदा : तीन दिवसांपासून पाटोदा आणि परिसरात सूर्य आग ओकत असून तपमान ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून लग्न समारंभातील उपस्थितीवरही परिणाम दिसून येत आहे. ...
यावर्षी नऊ वर्षांच्या हंगामातील सर्वाधिक उच्चांकी कमाल तापमानाची नोंद झाली आहे. मागील दहा वर्षांमध्ये नोंदविल्या गेलेल्या कमाल तापमानाचा विक्रम शनिवारी (दि.२७) मागे पडला. मागील आठवडाभरापासून सूर्य आग ओकू लागल्याने नाशिककर अक्षरक्ष: भाजून निघाले आहे. ...
कडक उन्हामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. शुक्रवारी या मोसमातील नागपूरचे तापमान पहिल्यांदाच ४५.२ अंश सेल्सिअसवर पोहोचले. दुसरीकडे पुढील पाच दिवस अशीच भीषण गर्मी राहणार आहे. ...
यापूर्वी ३० एप्रिल २००९ रोजी पुण्यात 41.7 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली होती़ तर ३० एप्रिल १८९७ रोजी पुणे शहरात 43.3 अंश सेल्सिअस इतके आजवरच उच्चांकी तापमान नोंदविण्यात आले होते़ . ...