कचऱ्यावर प्रक्रिया करून सीएनजी व ग्रीन हायड्रोजन तयार करण्याची सुरुवात केली तर कचऱ्याच्या प्रक्रियेची समस्या दूर होईल. शिवाय स्वच्छता रँकिंगमध्ये नागपूरला याचा फायदा होईल, असे महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले आहेत. ...
मीरा भाईंदर महापालिका शून्य कचरा कुंडीचे शहर म्हणून मिरवत असली तरी प्रत्यक्षात मात्र ते तद्दन खोटे आहे. कारण शहरात ठिकठिकाणी उघड्यावरील कचरा कुंड्या मोठ्या प्रमाणात असून पालिकेचे कर्मचारी तसेच परिसरातील रहिवाशी कचरा आणून टाकत आहेत. ...
रविवारच्या अभियानात आय-क्लिन नागपूरच्या कार्यकर्त्यांनी अंबाझरी तलाव परिसरातून तब्बल १५ बॅग कचरा काढला. यात खर्रा, गुटख्याचे पाऊच, प्लास्टिक बाॅटल, चाॅकलेटचे रॅपर व स्नॅक्स बॅग्जचा कचरा अधिक प्रमाणात होता. ...
Nagpur News नागपूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी धंतोली परिसरात दुकानातील कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकल्याने दुकान मालक नानकराम वाधवानी यांच्याकडून २० हजार रुपयांचा दंड वसूल केला. ...
Nagpur News मनपा प्रशासनाने १५ डिसेंबरपासून ओला आणि सुका कचरा वेगवेगळा संकलित करण्याचे आदेश शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या एजी एन्व्हायरो व बीव्हीजी कंपन्यांना दिले होते. मात्र मागील पाच दिवसांत यात फारशी सुधारणा झालेली नाही. ...
Nagpur News : बुधवारपासून विलगीकृत नसलेला कचरा नागरिकांकडून स्वीकारू नका, असे निर्देश मनपा आयुक्तांनी शनिवारी स्वच्छता विभागाला दिले. सोबतच नागरिकांनी आपल्या घरातील कचरा वेगवेगळा करूनच द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. ...