नाशिक : गणेशोत्सव मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यास कायदा सुव्यवस्था राखण्यास मदत होईल असे प्रतिपादन सहायक पोलीस उपायुक्त अरविंद आडके यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात आयोजित गणेशोत्सव मंडळ बैठकीत केले़ ...
यंदाचा गणेशोत्सव अवघा आठवडाभरावर येऊन ठेपला असताना महानगरपालिकेने गणेशोत्सवासंबंधीचे नियम व अटी शिथिल के ल्याने संपूर्ण शहरासह उपनगरांमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये उत्साह संचारला असून, सर्वत्र लाडक्या गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. ...
गणेश चतुर्थीला चाकरमान्यांना कोकणाकडे जाणे सुकर व्हावे, यासाठी मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम तात्काळ पूर्ण करा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पनवेल येथे दिले. ...
अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपलेल्या लाडक्या बाप्पाचे आगमन सोनपावलांनी व्हावे, म्हणून मंडळांमध्ये चढाओढ लागली आहे. सोन्या-चांदीच्या पावलांसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून आशीर्वाद हातांनाही पसंती मिळत असल्याचे सुवर्णकार नाना वेदक यांनी सांगितले. ...
शहरातील अजिंठा रोडवर यावर्षीही या ठिकाणी काही मूर्तिकारांनी आपले बस्तान मांडले आहे. स्थानिक मूर्तिकारांसह राजस्थानातून काही कुटुंबीय या ठिकाणी आले असून विविध मूर्ती बनविण्याचे काम आता अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले. ...