भारत हा जगातील सर्वात मोठा डाळिंब उत्पादक देश आहे. भारतामध्ये डाळिंब हे पीक, आंबिया बहार, मृग बहार व हस्त बहार या तिनही बहारात घेतले जाते. थोडक्यात भारतामध्ये डाळिंब पीक वर्षभर घेतले जाते. ...
रोहा तालुक्यातील सांगडे गावचे कृषिनिष्ठ शेतकरी केशव खरीवले यांच्या कलिंगड पिकाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळाली आहे. त्यांनी पिकविलेले कलिंगडाचे पीक थेट दुबईला रवाना झाले आहे. या शेतकरी कुटुंबाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ...
बाजारदराच्या असंतुलितपणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी गेल्या काही वर्षांपासून तोट्यात आहे. यावर आधुनिक पेरूची लागवड करून यशस्वी उत्पादन घेत युवा शेतकऱ्याने उपाय शोधला आहे. ...
गेल्या वर्षी हस्त बहर फुटला नाही. त्यामुळे लिंबाचे ४० टक्के उत्पादन घटले असून यंदा फेबुवारी महिन्यातच लिंबू भाव प्रतिकिलोला शंभरीजवळ गेला आहे. मार्च, एप्रिलमध्ये लिंबू भाव दोनशेपार जाण्याची शक्यता आहे. ...
बी. एस्सी. ॲग्रीच्या चौथ्या वर्षात शिकणाऱ्या प्रितम व प्रथमेश या दोन जिगरबाज विद्यार्थ्यानी तळसंदेत ३५ गुंठे कलिंगडाची शेती वाट्याने कसून जोमदार पीक आणले आहे. दोघांचे हे कष्ट कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहेत. ...