वनांचे उत्पादन केवळ काष्ठ उत्पादन नसून अकाष्ठ उत्पादनही असून, वनांची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी देशातील वन समृद्ध करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन वन महासंचालक तथा केंद्रीय पर्यावरण, वन मंत्रालय व हवामान बदल यांचे विशेष सचिव सिद्धांत दास यांनी केले. ...
एका बिबट्याने मागील चार दिवसांपासून नागरी वस्तीकडे मोर्चा वळविला होता. दरम्यान, दोन दिवसांपुर्वी एका शेतक-याला बिबट्याने जखमी केल्याची घटना घडली होती. त्यानंतर नागरिकांमधून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी जोर धरू लागली होती. ...
मागील एका वर्षापासून तालुक्यातील चिचगाव, वांद्रा, डोर्ली, आवळगाव, हळदा, मुडझा, बल्लारपूर, एकारा, भूज व नवेगाव परिसरात पट्टेदार वाघासह बिबट्यांचा धुमाकूळ वाढला आहे. पाळीव जनावरे व नागरिकांवर हल्ले होत असल्याने दहशत पसरली. ...
तेंदूपानांच्या विक्रीवर यावर्षीही मंदीचे सावट पसरले आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक रोजगार निर्मिती करणाऱ्या तेंदू संकलनावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. ही स्थिती पाहता वनविभागाने शासकीय संकलन सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. ...
जिल्ह्याच्या विविध भागात हिरव्या झाडांची सर्रास कत्तल सुरू आहे. या अवैध वृक्षतोडीदरम्यान आंबा, कडूनिंब, बाभळीची झाडे कापली जात असल्याचा प्रकार वनविभागाने केलेल्या शुक्रवारच्या कारवाईतून उघड झाला आहे. ...