लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
ही पूरस्थिती आणखी २४ तास कायम राहील, अशी माहिती ब्रह्मपुरीचे प्रभारी तहसीलदार संदीप भांगरे यांनी दिली. किन्ही चौगान येथे असलेल्या महावितरणच्या ३३ केव्ही उपकेंद्रात पाणी शिरले. आष्टी पुलावर तब्बल चार फूट पाणी आले आहे. आष्टी-चंद्रपूर मार्ग सोमवारीही बं ...
विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेवस्थानला वैनगंगा नदीच्या पुराने वेढा घातला. रविवारी पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानंतर सोमवारी पुराची पातळी वाढली. गावातील अनेक घरात पुराचे पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित जागे ...
पुरात अडकलेल्या मौदा तालुक्यातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी नागपूर महापालिकेच्या अग्निशमन पथकाने बचाव कार्य राबवून ५८ नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहोचविले. मनपाच्या सक्करदरा व लकडगंज अग्निशमन स्थानकातील पथकाद्वारे संयुक्तरीत्या हे बचाव कार्य करण्यात आले. ...
गोसेखुर्द धरणाचा ब्रम्हपुरी तालुक्यात जाणारा एक महत्वाचा लघु कालवा ४ जागी फुटला आहे. इ-३ ब्रांच असे या फुटलेल्या कॅनलचे नाव असून चौगान, कीन्ही, रणमोचन आणि खरकाडा या ४ गावाजवळ हा कॅनल पाण्याच्या प्रचंड दबावामुळे फुटला आहे. ...
पुराचे पाणी शिरल्याने पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. 36 तास हाती असताना वेळीच उपाययोजना केल्या असत्या, तर मोठे नुकसान टळले असते ...
संततधार पाऊस आणि पेंच (ता. पारशिवनी) व तोतलाडोह (ता. रामटेक) या जलाशयांसोबतच चौराई (मध्य प्रदेश) धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने, पेंच आणि कन्हान नदीला आलेला पूर कायम आहे. ...
मध्यप्रदेशातील संजय सरोवर, गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला आणि आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात शनिवारपासून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यात तुमसर, मोहाडी आणि पवनी तालुक्यातील गावांना पुराचा विळखा पडला. ...