कळणे मायनिंग परिसरातील डोंगराचा काही भाग खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 11:37 AM2021-07-29T11:37:15+5:302021-07-29T11:43:12+5:30

Flood Dodamarg Sindhudurg : कळणे मायनिंग परिसरातील डोंगराचा काही भाग खचला आहे. त्यामुळे भूस्खलन होऊन तेथील भाग खाणीत कोसळला आहे.परिणामी खाणीतील पाणी व चिखलयुक्त माती परिसरातील शेती, लोकवस्तीत येत आहे. रस्त्यावर चिखल आल्यामुळे कळणे-तळकट मार्ग तूर्तास बंद आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प आहे. त्या ठिकाणी ग्रामस्थांनी गर्दी केली आहे.

Part of the mountain in the Kalne Mining area was eroded | कळणे मायनिंग परिसरातील डोंगराचा काही भाग खचला

कळणे मायनिंग परिसरातील डोंगराचा काही भाग खचला

Next
ठळक मुद्देकळणे मायनिंग परिसरातील डोंगराचा काही भाग खचलारस्त्यावर,शेतीत चिखल घुसला ; कळणे-तळकट मार्ग बंद, दोन्ही बाजूने गर्दी

दोडामार्ग : कळणे मायनिंग परिसरातील डोंगराचा काही भाग खचला आहे. त्यामुळे भूस्खलन होऊन तेथील भाग खाणीत कोसळला आहे.परिणामी खाणीतील पाणी व चिखलयुक्त माती परिसरातील शेती, लोकवस्तीत येत आहे. रस्त्यावर चिखल आल्यामुळे कळणे-तळकट मार्ग तूर्तास बंद आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प आहे. त्या ठिकाणी ग्रामस्थांनी गर्दी केली आहे.

गेल्या आठवड्यात कणकवली तालुक्यातील दिगवळे रांजणवाडी येथे अचानक डोंगर कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला.  सह्याद्री पट्यात जोरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसात  हा डोंगराचा एक कडा पूर्णतः ढासळल्याची घटना घडली. मुसळधार पावसामुळे जवळपास एक किलोमीटरपेक्षा अधिक डोंगराचा भाग कोसळून अचानक वस्तीमध्ये आला होता.

या परिसरात तब्बल ३५ घरे आहेत. जाधव यांचे घर अगदी डोंगरालगत असून त्यांच्या घराच्या परिसरात भातशेती आहे. दोन हेक्टर शेती मध्ये हा मातीचा ढिगारा कोसळला आहे. मातीचा ढिगारा हटविण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने रस्ता खुला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. येण्या-जाणाऱ्या पुलावर मातीचा ढिगारा आल्याने रस्ता पूर्णतः बंद झाला. 

Web Title: Part of the mountain in the Kalne Mining area was eroded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app