परभणी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक परराज्यातील एटीएम फोडणाऱ्या टोळीचा पाठलाग करत असताना आरोपींनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी प्रतिउत्तरात गोळीबार केल्याचे समजते. ...
गोळीबारात बचावलेल्या सुजयने काही वर्षांपूर्वी वडिलांच्या बँक खात्यातून परस्पर ४ लाख रुपये काढले होते. याचा राग भगवान यांच्या मनात होता. सोमवारी विजयसोबत भांडण सुरू असताना सुजयदेखील तिथे उपस्थित होता. त्यामुळे सुजयवरदेखील जुना राग काढत गोळी झाडली. ...
भगवान यांच्याकडे परवाना असलेले पिस्तूल आहे. त्यांनी या पिस्तूलद्वारे काही महिन्यांपूर्वी मेहुणा व माजी नगरसेवक राजू पाटील यांनादेखील धमकावले होते, असेही समजते. यावेळी पोलिसांनी त्यांचे पिस्तूल जप्त केल्यानंतर पुन्हा ते ताब्यात दिले होते. ...