केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. Read More
दिल्लीच्या गाझिपूर सीमारेषेवर विरोधकांचं शिष्टमंडळ पोहोचलं होतं. या शिष्टमंडळात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंसह अनेक पक्षांचे नेते आणि खासदार उपस्थित होते. ...
राज्यसभा खासदार ज्योतिर्रादित्य शिंदे यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रदर्शन करत असताना, शेतकरी आंदोलनावरुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांना लक्ष्य केलंय ...