केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. Read More
Farmer Protest, Reliance Jio : कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणारे शेतकरी आणि त्यांचे सहकारी मोबाईल टॉवरचे नुकसान करत असल्याचा आरोप आहे. यापूर्वी शेतकऱ्यांनी रिलायन्स पेट्रोल पंप आणि रिलायन्स रिटेलला लक्ष्य केल्याचा आरोप झाला होता. ...
महाविकास आघाडीने सकाळी १० वाजता येथील राजकमल चौकात शेतकरीविरोधी कायदे व केंद्र शासनाचा निषेध करीत रॅली काढली. राजकमल चौक, गांधी चौक, जवाहर गेट, इतवारा बाजार, जयस्तंभ चौक ते इर्विन चौक या मार्गाने रॅली काढण्यात येऊन डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ ...